Home > Max Political > पुजा केली म्हणून भाजप नेत्यावर गुन्हा

पुजा केली म्हणून भाजप नेत्यावर गुन्हा

पुजा केली म्हणून भाजप नेत्यावर गुन्हा
X

भाजपकडून सातत्याने हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र आता भाजपचे नेते गणेश नाईक यांचे पूत्र आणि माजी खासदार असलेल्या संजीव नाईक यांच्यावर पुजा केल्याने गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे.

भाजपकडून कोरोना काळात मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्याबरोबरच भाजपकडून हनुमान चालीसा पठन करण्याचा, महाआरती करण्याचा मुद्दाही प्रचंड गाजला होता. मात्र आता भाजपचे नेते आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यावर मोरबे धरणाचे जलपुजन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणावर महापालिकेच्या परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश करता येत नाही. मात्र तिथे प्रवेश बंदी असतानी भाजप नेते संजीव नाईक यांच्यासह तीन माजी महापौर मोरबे धरणाच्या ठिकाणी गेले. त्याठिकाणी त्यांनी मोरबे धरणाचे जलपुजन केले. यावरून महापालिका प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यानंतर मोरबे धरणावर केलेल्या घुसखोरीवरून संजीव नाईक यांच्यासह तीन माजी महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई महापालिकेने पोलिसांकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील मोरबे धरणातील पाणीसाठा कमी असल्याने नवी मुंबईत पाणीकपात सुरू होती. मात्र आता 2011 नंतर पहिल्यांदाच मोरबे धरण हे 100 टक्के क्षमतेने भरले आहे. त्यापार्श्वभुमीवर मोरबे धरणाचे जलपुजन करण्याची तारीख सोमवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र त्यापुर्वीच भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक, पुतणे सागर नाईक तसेच समर्थक सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनाला कोणतीही पुर्वसूचना न देता रविवारी मोरबे धरणाचे जलपुजन केले. त्यामुळे संजीव नाईक यांच्या या कृत्याबद्दल महापालिका प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. तसेच सध्या नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे संजीव नाईक यांच्याकडे कुठलेही संविधानिक पद नसताना त्यांनी हे जलपुजन कसे केले? असा सवाल करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाने खालापूर पोलिसांकडे केली. त्यानंतर या प्रकरणी संजीव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 26 Sep 2023 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top