Home > Max Political > महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता: नाना पटोले

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता: नाना पटोले

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली महाराष्ट्राला जाणीवपूर्वक कमी लसींचा पुरवठा करून नरेंद्र मोदी पाकिस्तान आणि इतर देशांना लस पाठवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी केला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता: नाना पटोले
X

कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्ष लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. परंतु देशात कोरोना रुग्ण वाढत असताना नरेंद्र मोदी हे पाकिस्तान व इतर देशांना लस पाठवत आहेत. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना ते महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता. बसस्टँडसारख्या सार्वजनिक ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवल्याने त्यावेळी महामारीवर मात करण्यात यश आले पण सध्या केंद्रातील सरकार तसे करताना दिसत नाही. नागपूरमध्येही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत. प्रशासनही त्यांचे काम करत आहे. नागपुरच्या आसपासच्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण तुलनेने कमी असताना नागपूरातच कोरोना रुग्ण संख्या कशी काय वाढू लागली असा प्रश्न उपस्थित करत पुलावामा स्फोटात वापरले गेलेले आरडीएक्स, अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत सापडलेली स्फोटके आणि नागपूर कनेक्शन तसेच नागपुरात कोरोना का वाढतो याचे कनेक्शन काय आहे. अशी विचारणा त्यांनी केली.

रश्मी शुक्ला आणि परमवीरसिंह प्रकरणी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचे कठपुतळी बनू नये, त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करावे. कोणत्यातरी पक्षाला समर्पित होऊन अधिकारी काम करु लागले तर ते लोकशाही तसेच प्रशासकीय व्यवस्थेलाही घातक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परमवीरसिंह व रश्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजपा व फडणवीस यांची खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका राहिली असून सुशांतसिंह प्रकरण असो वा परमवीरसिंह प्रकरण असो यातही त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले आहे असेही पटोले म्हणाले.


Updated : 27 March 2021 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top