Home > Max Political > भारतात एक अशी संघटना आहे जिने 52 वर्षे आपल्या कार्यालयात हा तिरंगा फडकवला नाही - राहुल गांधी

भारतात एक अशी संघटना आहे जिने 52 वर्षे आपल्या कार्यालयात हा तिरंगा फडकवला नाही - राहुल गांधी

भारतात एक अशी संघटना आहे जिने 52 वर्षे आपल्या कार्यालयात हा तिरंगा फडकवला नाही - राहुल गांधी
X

इंदूरच्या महू येथे पोहोचलेल्या राहुल गांधींनी आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. यानंतर ते सभेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी जेपी अग्रवाल आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मंचावर उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्या सभेतील लाइव्ह अपडेट..


राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे :

- राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बब्बर शेर म्हटले, ते म्हणाले की इतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते 3 हजार 500 किलोमीटर चालू शकत नाहीत.

- आमचा प्रवास कन्याकुमारीपासून सुरू झाला, आम्ही आतापर्यंत 2000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. हा तिरंगा आम्ही श्रीनगरमध्ये फडकवू. राहुल गांधींनी दिनेश नावाच्या कार्यकर्त्याला मंचावर बोलावून तिरंगा फडकवला.

- महू ही आंबेडकरांची, संविधानाची आणि तिरंग्याची भूमी आहे. हा तिरंगा आम्ही श्रीनगरला घेऊन जात आहोत. आपले संविधान तिरंग्याला बळ देते.

- RSS वर घणाघात - भारतात एक अशी संघटना आहे, जिने 52 वर्षे आपल्या कार्यालयात हा तिरंगा फडकवला नाही, एक संघटना आहे, बाकी सर्वांनी हा तिरंगा फडकावला. एका संस्थेने आपल्या लाडक्या तिरंग्याला सलामी दिली नाही.याचे कारण काँग्रेस पक्ष आणि आंबेडकरांनी मिळून केलेले कार्य आहे. महात्मा गांधी, नेहरू जी, सरदार पटेल, आझाद जी, आंबेडकर जी, सुभाषचंद्र बोस जी, अशा अनेक वीरांनी आपले संपूर्ण आयुष्य देऊन, रक्त आणि घाम गाळून या देशाला संविधान दिले. हे काही छोटे काम नव्हते. भारताच्या इतिहासात प्रथमच आम्हाला समान अधिकार मिळाले. त्याचे प्रतीक म्हणजे आपला लाडका तिरंगा.

- आरएसएस आणि भाजपचे लोक समोरून राज्यघटना नष्ट करू शकत नाहीत, त्यांच्यात तेवढी हिंमत नाही, कारण ज्या दिवशी त्यांनी समोरून हा प्रयत्न केला, भारताचा आवाज त्यांना एका सेकंदात थांबवेल. त्यामुळे हे काम गुपचूप केले जात आहे..

- भारत जोडो यात्रेचा उद्देश भारताला जोडणे आहे. RSS ने देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवली आहे, तुम्ही त्यांचे धोरण आणि आमचे धोरण पहा आम्ही गरीबांना मदत करण्यासाठी आणि देशात बंधुता आणण्यासाठी कार्यक्रम केले.

- संविधानाने पत्रकारांनाही अधिकार दिले आहेत, आमच्या यात्रेबद्दल बोलणार नाही, त्यासाठी लिहिणार नाही, लाखो लोक बाहेर पडत आहेत तरी माध्यम दखल घेत नाहीत.

- RSS आपल्याच लोकांना संविधानिक संस्थांमध्ये बसवत आहे, संविधान नष्ट करणे हा त्यांचा उद्देश आहे, हे काम RSS करत आहे. कॉंग्रेस आणि भारताची जनता त्यांना हे काम कधीच करू देणार नाही.

- नोटाबंदी आणि जीएसटीने पंतप्रधान मोदी आणि भाजपने तुमचे व्यवसाय उद्ध्वस्त केले..

- इंजिनियरिंग करा आणि मोदींच्या भारतात मजूर बना, एमबीबीएस करा आणि मजूर बना, भारतातील तरुणांना रोजगार मिळत नाही.

-छोटे व्यापारी, छोटे व्यवसाईक लोकांना रोजगार देतात, ते नोटाबंदी आणि जीएसटीने संपवले..

- भाजपवाल्यांना भीती पसरवायची आहे. त्यामुळे भाजप त्या भीतीचे द्वेषात रूपांतर करू शकते...

- माझ्या आजीला 32 गोळ्या लागल्या, माझे वडील बॉम्बने मारले गेले, माझ्यावर हिंसाचार झाला. पण ज्या दिवशी माझ्या मनातून भीती नाहीशी झाली, त्या दिवसापासून माझ्या मनात फक्त प्रेम आहे. मी आरएसएसशी लढतो, मोदींशी लढतो पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष नाही. कारण माझ्या मनात भीती नाही. मी मोदी, शहा आणि आरएसएसच्या लोकांना सांगतो, मनातून भीती काढून टाका, द्वेष संपेल. हा आमच्या यात्रेचा संदेश आहे. आमचे बब्बर सिंह कोणालाही घाबरत नाहीत.

- प्रेम करणारे कोणाला घाबरत नाहीत. भयभीत लोक कधीच प्रेम करत नाहीत. आम्ही घाबरत नाही, आम्ही प्रेम करतो.

- मी आंबेडकरांची पुस्तक वाचले आहेत, त्यात मला कोणतीही भीती दिसली नाही. त्याच्या मनात द्वेष नव्हता.

- भाजप आणि आरएसएसचे लोक समोरून नतमस्तक होतील, मागून संविधान नष्ट करण्याचे काम करतात, तेच ते गांधीजींसोबत करतात...


मल्लिकार्जुन खर्गे याच्या भाषणातील मुद्दे :

- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जनतेला संविधानाची शपथ दिली

- आरएसएस आणि भाजपच्या लोकांना संविधान नष्ट करायचे आहे, पण आम्ही संविधान वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपण सर्व मिळून देशाची एकता आणि संविधान वाचवू.

- ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​संविधान वाचवलं पाहिजे नाही तर आपल्याला गुलाम बनवलं जाईल

- संविधानाचे रक्षण केले नाही तर पुन्हा गुलाम होऊ.

-बाबासाहेबांनी दलित, मागास, महिलांना नवी दिशा दाखवली, त्यांनी बनवलेले संविधान देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. पण आजच्या सरकारला हे संविधान मोडायचे आहे. ते वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

- महू भूमी ही पवित्र भूमी आहे, आम्ही येथे संविधान दिन साजरा करत आहोत.

- काही लोक बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यातील भांडणावर बोलतात, हे लोक फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाचे आहेत, त्यामुळे आपण जागरूक राहणे आवश्यक आहे.

-तुम्ही तुमचा धर्म, पंत, जात बाजूला ठेवा, देशाला प्रथम ठेवा, हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे

Updated : 26 Nov 2022 4:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top