Home > Max Political > दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षडयंत्र: संजय राऊत

दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षडयंत्र: संजय राऊत

Conspiracy to destabilize the government by creating riots sanjay raut Amravati bandh Tripura violence

दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षडयंत्र: संजय राऊत
X

दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षड्यत्र: संजय राऊतत्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्रात अमरावती येथे शुक्रवारी झालेल्या हिंसाचार आणि दगडफेकीच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदची हाक दिली आहे. आज सकाळी दहा वाजता शहरातील प्रमुख चौकात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना काहींनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांवर दगडफेक केली.

यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले...

ईडी, एसीबी, सीबीआय वापरुनही राज्य अस्थिर होत नसल्याचं पाहून हे दंगलीचं कारस्थान रचलं जात आहे. भाजप धार्मिक द्वेष, जातीय दंगली घडवल्याशिवाय राजकारण करुच शकत नाही. तेच इथे दिसून येतंय. ज्या संघटनेकडून हे घडतंय तिची ताकद तेवढी नाहीच आहे. मुस्लिम समाजात तेवढा पाठिंबा नसून ही रजा अकादमी ही संघटना भाजपची बहिण संघटना मानली जाते. हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचं मोठं कारस्थान आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

प्रायोजित केलेली दंगल...

रझा अकादमी हे भारतीय जनता पक्षाचं पिल्लू आहे. रझा अकादमी ला मुस्लीम समाजात अजिबात स्थान नाही. ही संघटना सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत असते हे सर्वांना माहित आहे. विरोधी पक्षाने दंगल घडवण्याचं ठरवलंच आहे. अमरावतीत सातत्याने हे केलं जातंय. सातत्याने तिथलं राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा शोध गृहमंत्र्यांनी आता घेतला पाहिजे.

असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Updated : 13 Nov 2021 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top