Home > Max Political > मल्लिकार्जुन खरगेंनी ८ वर्षांचा हिशेब चुकता केला, पंतप्रधान मोदींवर संसदेत घणाघात

मल्लिकार्जुन खरगेंनी ८ वर्षांचा हिशेब चुकता केला, पंतप्रधान मोदींवर संसदेत घणाघात

मल्लिकार्जुन खरगेंनी ८ वर्षांचा हिशेब चुकता केला, पंतप्रधान मोदींवर संसदेत घणाघात
X

लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है और अखबार भी तुम्हारा है... असे म्हणत विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर संसदेत घणाघात केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभागृहात स्वत: उपस्थितीत होते. "७० वर्षांचा हिशेब आमच्याकडे मागता, पण ७० वर्षात आम्ही केले नसते तर तुम्ही जिवंत राहिला नसतात" या शब्दात खरगे यांनी सुनावले. राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे निवडणुकीचे भाषण वाटले, अशी टीका करत त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.


महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आंदोलन, चीनबाबत पंतप्रधान मोदींनी बाळगलेले मौन यासर्व मुद्द्यावर खरगे यांनी जोरदार हल्ला केला. २०१४ पूर्वी चीनमधून होणारी आयात आता अनेक पटींनी वाढल्याची आकडेवारी देत त्यांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष केले. एवढेच नाही तर मनमोहन सिंग सरकारला चीनबाबत प्रश्न विचारणारे मोदी गप्प का, त्यांनी पुन्हा केदारनाथच्या गुहेत जाऊन मौन धारण केले आहे का, असा थेट सवाल देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारला. यावेळी खरगे यांनी आपल्या भाषणात शेरोशायरीचा वापर करत मोदी सरकारला चिमटे काढले. तर त्यांनी आपले संपूर्ण भाषण हिंदी भाषेत केले.

Updated : 2 Feb 2022 4:50 PM IST
Next Story
Share it
Top