Home > Max Political > काँग्रेस कार्यकारणीत दोन तृतीयपंथींचा समावेश

काँग्रेस कार्यकारणीत दोन तृतीयपंथींचा समावेश

काँग्रेस कार्यकारणीत दोन तृतीयपंथींचा समावेश
X

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आलं आहे.

सलमा खान साकेरेकर आणि पार्वती जोगी या दोन तृतीयपंथीयांची काँग्रेस सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्गासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना संधी देत सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केल्याचं दिसून येत आहे. तृतीय पंथीयांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आल्यानंतर कॉंग्रेसने पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं दिसून येतंय.

दरम्यान कॉंग्रेसने जाहीर केलेल्या या कार्यकारणीमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.

सोबतच काँग्रेसच्या महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांची देखील निवड केली आहे. शिस्तप्रिय नेते अशी ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर अमरजीत मनहास हे काँग्रेसचे खजिनदार म्हणून काम पाहतील.

नव्या काँग्रेस कार्यकारिणीसोबतच कॉंग्रेस 14 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देखील जाहीर केले आहेत. त्यामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांना सोलापूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष करण्यात आलं आहे. तर विक्रम सिंह सावंत यांना सांगली ग्रामीण चे अध्यक्ष पद देण्यात आले आहे

विशेष म्हणजे काँग्रेसच्या कार्यशैलीबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 जणांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता. आणि आता त्यांच्याकडेच राज्याच्या शिस्तपालन कमिटीची धुरा सोपवण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलंही महत्वाचं पद नाही. आता त्यांची काँग्रेसच्या शिस्तपालन कमिटीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

अमरजित मनहास यांची खजिनदार पदी, जनरल सेक्रेटरी पदी धीरज देशमुख, आशिष देशमुख, शैलेश पाटील, सचिन सावंत यांची वर्णी लागली आहे. तर सचिव पदाची जबाबदारी सचिन गुंजाळ यांच्यावर देण्यात आली आहे.

या नव्या कार्यकारणीमध्ये काँग्रेसकडून जातीय समतोल राखलेला पाहायला मिळतोय, नव्या कार्यकारणीत 190 जणांचा समावेश आहे त्यात मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, तृतीयपंथी 2 अशा पद्धतीनं स्थान देण्यात आले आहे. या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated : 27 Aug 2021 4:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top