Home > Max Political > एकनाथ शिंदे उध्दव ठाकरेंना पक्षप्रमुख मानत नाहीत का?

एकनाथ शिंदे उध्दव ठाकरेंना पक्षप्रमुख मानत नाहीत का?

एकनाथ शिंदे उध्दव ठाकरेंना पक्षप्रमुख मानत नाहीत का?
X

बुधवार २७ जुलै रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांनी उध्दव ठाकरेंना या शुभेच्छा शिवसेना प्रमुख म्हणून नाही तर राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्या आहेत.

शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिना झाल्यानंतर शिवसेनेत आजवरचं सर्वात मोठं बंड झालं. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह ४० सेनेच्या तसेच १० अपक्ष आमदारांना घेऊन बंड केलं. त्यांच्या या बंडानंतर काय काय झालं हे सारं जग जाहीर आहे. आतापर्यंत उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यपणे टीका करणं टाळलं होतं. मात्र मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांचा पालापाचोळा असा पहिल्यांदा उल्लेख केला.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र ज्या पध्दतीने दिल्य़ा त्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. कारण त्यांनी शुभेच्छांचं ट्विट करताना उध्दव ठाकरेंचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा केला आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत, " महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना...."

एकनाथ शिंदे उध्दव ठाकरेंना पक्षप्रमुख मानत नाहीत का?

आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व समर्थक आमदारांना उध्दव ठाकरे आणि ठाकरे कुटूंबावर टीका न करण्याचे आदेश दिले होते. आज पर्यंत त्यांनी कधीही प्रत्यक्ष टीका ठाकरे कुटूंबावर केली होती. आता मात्र उध्दव आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अबोला कमालीचा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यापध्दतीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हासाठी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली. ज्याप्रमाणे उध्दव ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना पुन्हा स्वतंत्र कार्यकारीणी तयार करून पदवाटप केलं. पण नव्या कार्यकारीणीत पक्षप्रमुख कोण हे मात्र सांगितलं नव्हतं. त्यानंतर तर उध्दव ठाकरे एकनाथ शिंदेंना माफ करण अशक्य होतं. उलट सामना ला दिलेल्या मुलाखतीत उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय अशी टीका केली. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा पाहता ते आता उध्दव ठाकरेंना पक्षप्रमुख मानत नाहीत का आणि नसतील तर ते स्वतःला पक्षप्रमुख मानतात का असा सवाल उपस्थित होतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता १ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.

Updated : 27 July 2022 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top