Home > Max Political > छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न बाबासाहेबांनी संविधानातून पूर्ण केलं

छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न बाबासाहेबांनी संविधानातून पूर्ण केलं

छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न बाबासाहेबांनी संविधानातून पूर्ण केलं
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यामुळं या देशाची विचारसरणी ही समता आणि समानता या दोनच तत्त्वांवर आधारीत आहे. मात्र, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी ही हिंदूत्ववादी असल्याची दाखवण्यात येते. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या धर्माचे नाही तर रयतेचे राज्य निर्माण केले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचे स्वराज्य संविधानाच्या माध्यमातून स्थापन केले, असं मत राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मॅक्स महाराष्ट्र आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित विचारांचे संघर्षयोद्धे या कार्यक्रमात राजरत्न आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांबाबतचे परखड विचार मांडले. ते म्हणाले, “ देशातील मीडिया ही मनूवादी मीडिया आहे. त्यामुळे आमच्यावर होणाऱ्या अत्याचाराला केवळ 75 सेकंदसुध्दा वेळ दिला जात नाही. एवढंच नाही तर RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द होणाऱ्या आशयाचं नियंत्रण करण्यासंदर्भात वक्तव्य केलं. त्यामुळे अशा प्रकारे माध्यमांना नियंत्रण केले जात असताना आपण आपले वंचितांचा मीडिया उभा केला पाहिजे.

कारण जो समाज आपल्या महामानवाच्या जयंतीसाठी 2100 कोटी खर्च करू शकतो. तो समाज आपलं प्रतिबिंब उमटवण्यासाठी आणि आपला मीडिया का उभा करू शकत नाही?, असा सवालही यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. पुढे राजरत्न आंबेडकर म्हणाले, मॅक्स महाराष्ट्र चॅनल बंद करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जो शोषित, वंचितांचा आवाज बनला आहे, अशा मॅक्स महाराष्ट्रच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे, असं मत व्यक्त केले.

Updated : 18 Jun 2023 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top