Home > Max Political > बडबड बंद करावी अन्यथा समाज जागा दाखवेल, आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर पलटवार

बडबड बंद करावी अन्यथा समाज जागा दाखवेल, आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर पलटवार

बडबड बंद करावी अन्यथा समाज जागा दाखवेल, आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर पलटवार
X

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांनी आपली बडबड बंद करावी अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा जोरदार पलटवार त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने आरोप करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांच्या याच टीकेला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा नौटंकी सुरू झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करू लागले आहेत, त्यामूळे ते फडणवीसांना ब्राम्हण म्हणून हिणवत आहेत. यापूर्वीही जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती. आता देखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नौकरीत १० टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे असीच बडबड करत राहिले, तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल, असं प्रसाद लाड म्हणाले.

Updated : 4 March 2024 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top