Home > Max Political > चंद्रशेखर बावनकुळेंची उध्दव ठाकरेंवर टीका...! काय म्हणाले? वाचा बातमी

चंद्रशेखर बावनकुळेंची उध्दव ठाकरेंवर टीका...! काय म्हणाले? वाचा बातमी

चंद्रशेखर बावनकुळेंची उध्दव ठाकरेंवर टीका...! काय म्हणाले? वाचा बातमी
X

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना(उबाठा) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचा महानायालक कोण? अशी जर स्पर्धा घेतली तर त्या स्पर्धेत उध्दव ठाकरे त्यात प्रथम येतील, अशी टीका करत बानवकुळेंनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांवर उध्दव ठाकरेंनी टीका केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

दरम्यान बावनकुळे पुढे म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळात(अडीज वर्षे) सत्तेच्या नावाखाली नालायकपणाचा कळस गाठला होता. पालघर येथे झालेल्या हत्याकांडात उध्दव ठाकरे मूग गिळून बसले होते. १०० कोटी वसूली रॅकेट चालवत अंधाधुंदी कारभार केला. याशिवाय कोव्हीडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, अशी टीका बावनकुळेंनी ठाकरेंवर केली.

जनता तुम्हाला कायमचे घरी बसवेल

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आहे. आता ते वाट्टेल तसं बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला फरक पडणार नाही. पण येत्या लोकसभा निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Updated : 21 April 2024 7:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top