Home > Max Political > चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलतात, अंबादास दानवेंचा आरोप

चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलतात, अंबादास दानवेंचा आरोप

चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलतात, अंबादास दानवेंचा आरोप
X

आगामी दोन दिवसात अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे. यावर आता आंबादास हे आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, मी नाराज असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाही. मी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. असं दानवे आपली यांनी सांगितले.

दरम्यान दानवे असंही म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख नेत्याजवळ हट्ट करणे हा माझा अधिकार आहे. आताच्या येणाऱ्या बातम्या बदनामी करणाऱ्या आहेत. मी संघटनेच्या नेत्यांच्या आदेश मानणारा नेता आहे. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. माझ्याकडे पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली असताना मी नाराज होणं, इकडे तिकडे जाणे, या हवेतील गप्पा आहेत. मी मागच्या दहा वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. मी माझी इच्छा लपवून ठेवलेली नाही. या मतदारसंघात अजूनही साहेबांनी उमेदवार दिलेला नाही, असं यावेळी आंबादास दानवे म्हणाले.

दानवे पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन निवडणूकीत मी प्रचारप्रमुख होतो. यावेळी पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी पार पाडेल. आमचा काही वाद नाही तर आमच्या पक्षात स्पर्धा आहे. शिंदे गटात मी कधी जाणार नाही असं सष्ट मत दानवे यांनी मांडलं. जोपर्यंत उध्दव ठाकरे मतदारसंघातील उमेदवाराचा जाहीर निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत मी उमेदवारीसाठी दावेदार आहे, छत्रपती संभाजी नगरमधून कोण लढणार हे अजूनही निश्चित झालेलं नाही. असं दानवे म्हणाले

माझ्यात आणि इतर नेत्यात फरक आहे, मी माझं मत बिनधास्त मांडतो. दोन दिवसापूर्वी कार्यालयाच्या उद्धाटनाची कल्पना नव्हती. प्रचाराची जबाबदारी असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी आहे. याबाबत पक्षप्रमुखांना मी सांगितलं आहे. मी उमेदवारीसाठी ईच्छा व्यक्त केली, आग्रह केला. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलतात, असा आरोपही दानवे यांनी यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे यांच्यावर केला.

Updated : 16 March 2024 3:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top