Home > Politics > अटलबिहारी वाजपेयी यांचा विश्वासू मोदी मंत्रीमंडळात कॅबिनेट पदावर

अटलबिहारी वाजपेयी यांचा विश्वासू मोदी मंत्रीमंडळात कॅबिनेट पदावर

अटलबिहारी वाजपेयी यांचा विश्वासू मोदी मंत्रीमंडळात कॅबिनेट पदावर
X

असं पहिल्यांदाच घडतंय की अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee यांच्या विश्वासातील एका व्यक्तीचा थेट मोदी मंत्रीमंडळात समावेश होतो आहे. तसं जर पाहिलं तर हे अटल आणि अडवाणी atal bihari vajpayee and lal krishna advani era युग नाही. हे मोदी शहा जोडीचं युग आहे. Modi Shaha era असं म्हटलं जायचं. मात्र, कोरोना काळात बसलेल्या झटक्यानं मोदी आणि शहा यांनी वेळेतच शहाणं होतं, नावाला रथी महारथी असणाऱ्या दिग्गज नेत्यांना कामाचं मुल्यमापन करत बाजूला केलं. आणि काही अनुभवी लोकांना संधी दिली. Ashwini Vaishnaw new Ministry of Railways

मोदी सरकारने आता माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सचिव राहिलेले अश्विनी वैष्णव यांचा मंत्रीमंडळात समावेश केला आहे. अश्विनी वैष्णव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदी निवड होणं धक्कादायक मानलं जात आहे. दोन वर्षापूर्वीच त्यांनी ओडिसातून भाजपच्या तिकिटावर राज्यसभा निवडणुका जिंकून सगळ्यांना चकित केलं होतं. कारण पक्षाकडे तितक्या आमदारांची संख्या नव्हती. तरही त्यांनी नंबर जुळवून आणत निवडणूक आपल्या खिशात घातली.

कोण आहेत अश्विनी वैष्णव? Who is ashwin vaishnav

राजस्थान च्या जोधपूर मध्ये अश्विनी वैष्णव यांचा जन्म झाला. 51 वर्षीय वैष्णव 1994 बॅचचे ओडिसा कॅडर चे भारतीय प्रशासकीय सेवा (आईएएस) अधिकारी राहिले आहेत. former Indian Administrative Service (IAS) भाजपा मध्ये असूनही त्यांनी राज्यसभा निवडणुकीत ओडिसाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांचं समर्थन मिळवलं.

बीजद च्या अंतर्गत अनेक नेत्यांनी यावर टीका देखील केली होती. असा आरोप लावला जातो की, पटनायक पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि गृह मंत्री अमित शहा Amit shaha यांच्या दबावाखाली आले आणि वैष्णव यांचे समर्थन केले.

वैष्णव यांनी 28 जून, 2019 रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकींच्या 6 दिवस अगोदर भाजपमध्ये एंट्री केली होती. प्रशासकीय सेवा करत असताना त्यांनी बालेश्वर आणि कटक जिल्ह्यांचं जिल्हाधिकारी पदाचीही जबाबदारी सांभाळली. 1999 साली चक्रीवादळात त्यांनी आपल्या कामाचं कौशल्य दाखवत सरकारला योग्य त्या सूचना दिल्यानं अनेकांचे जीव वाचवता आले.

वैष्णव यांनी 2003 पर्यंत ओडिसामध्ये काम केलं आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणू नियुक्त झाले. पंतप्रधान पद गेल्यानंतर त्यांना वाजपेयी यांचं सचिव करण्यात आलं. आईआईटीत शिक्षण घेतलेल्या अश्विनी वैष्णव यांनी 2008 मध्ये सरकारी नोकरी सोडून अमेरिका च्या व्हार्टन विद्यापीठातून एमबीए केलं.

भारतात आल्यानंतर त्यांनी मोठ्या कंपनीत नोकरी केली आणि गुजरात मध्ये ऑटो उपकरणाचे उत्पादन युनिट्स स्थापन केले. याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांना भारतीय प्रेम परिषद चे सदस्य म्हणून नामांकित देखील करण्यात आलं होतं.

Updated : 2021-07-08T14:39:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top