Home > Max Political > पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचं अभिनंदन नाही...

पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचं अभिनंदन नाही...

पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचं अभिनंदन नाही...
X

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्री पद मिळाली. त्यामध्ये नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपील पाटील यांचा नंबर लागला. या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपच्या वतीने या मंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांनी या मंत्र्यांना ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी या मंत्र्यांना ट्वीटरवरून शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान दिलं जाण्याची शक्यता होती. तशी चर्चा देखील होती. वंजारी समाजाला केंद्रात गोपिनाथ मुंडे नंतर त्यांची कन्या खासदार प्रितम मुंडे यांना मंत्री पद दिलं जाईल. असं बोललं जात होतं. मात्र, तसं झालं नाही. प्रितम मुंडे यांच्या ऐवजी गोपिनाथ मुंडे यांचे निष्ठावान अशी ओळख असणारे खासदार भगवान कराड यांना मंत्री करण्यात आले. त्यामुळे दोनही बहिणी नाराज असल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत: ही बातमी नाकारली होती. या संदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीट नंतर त्यांनी अद्याप एकही ट्वीट केलेले नाही.

खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..

अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

Updated : 8 July 2021 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top