Home > Max Political > परप्रांतियांबद्दलची भुमिका बदलेपर्यंत मनसेसोबत युती नाही: चंद्रकांत पाटील

परप्रांतियांबद्दलची भुमिका बदलेपर्यंत मनसेसोबत युती नाही: चंद्रकांत पाटील

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वपक्षीय मोर्चेबांधनी सुरु असताना शिवसेनाला शह देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलून फक्त स्थानिकांनाच नोकऱ्यांचा हट्ट सोडणार नाही, तोपर्यंत भाजप-मनसे युती होऊ शकत नाही असं सागितलं आहे.

परप्रांतियांबद्दलची भुमिका बदलेपर्यंत मनसेसोबत युती नाही: चंद्रकांत पाटील
X

पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले, "मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेलं आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलं आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे.

शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही.

आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही," असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केलं.

"युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही. मी वारंवार तुमच्या माध्यमातूनच मांडतोय. ज्यांचा त्यांच्यासोबत संवाद आहेत, ते लोक चर्चा करतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंना पाठवलेल्या पत्राबाबत बोलताना पाटील म्हणाले, "माझ्या दृष्टीने हा विषय संपला आहे. मी फक्त वहिनींना तुम्ही सुसंस्कृत महिला संपादक असताना ही भाषा तुमच्या नावाला चिकटतेय. असं म्हणून शेवटी असं म्हटलं होतं की, पण तुम्हाला जर ती भाषा चालणार असेल, तर शुभेच्छा. आता काय चाललंय हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे," असं म्हणत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावर अधिकच बोलणं टाळलं आहे.

Updated : 4 Jan 2021 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top