Home > Max Political > "कलाम यांना मोदींनी राष्ट्रपती केलं" चंद्रकांत पाटील इतिहास विसरले

"कलाम यांना मोदींनी राष्ट्रपती केलं" चंद्रकांत पाटील इतिहास विसरले

आपल्या नेत्याचा उदोउदो करण्याच्या नादात अनेकजण मोठमोठे दावे करतात. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उदोउदो कऱण्याच्या नादात चुकीचा इतिहासच मांडला आहे.

कलाम यांना मोदींनी राष्ट्रपती केलं चंद्रकांत पाटील इतिहास विसरले
X

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी मात्र चंद्रकांत दादा इतिहासच विसरले आहेत. नुसता इतिहास विसरले नाहीत तर त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा निर्णय चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर खपवला आहे. भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित युव वॉरियर्स या पुण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम विरोधक नाहीत असा दावा कऱण्याच्या नादात चंद्रकांत दादांनी चक्क मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते,असा अजब दावा करुन टाकला.

सत्य काय?

वास्तविक ए.पी.जे अब्दुल कला यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा होता. त्यावेळी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २० पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय़ एकमताने घेतला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय पातळीवर उदयसुद्धा झालेला नव्हता. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारुन जेमतेम वर्षभराचा कालावधी लोटला होता. विशेष म्हणजे अब्दुल कलाम २००२मध्ये राष्ट्रपती झाले. त्याचवर्षात नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी दंगली झाल्या होत्या आणि यात अनेक मुस्लिमांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप देखील झाला होता.


नरेंद्र मोदी यांचा उदोउदो करण्याच्या नादात चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने चुकीचा इतिहास मांडल्याचे सिद्ध झाले आहे. केवळ एवढेच नाहीतर भाजपला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात मोलाचा वाटा असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचे कर्तृत्व मोदींच्या नावावर खपवण्याचा प्रयत्नही त्यांनी केल्याचे दिसते आहे.

Updated : 20 Feb 2021 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top