Top
Home > Max Political > स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपकडून आर्थिक मदत

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपकडून आर्थिक मदत

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपकडून आर्थिक मदत
X

पुणे// एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. स्वप्नीलने आत्महत्या केल्यानंतर नियुक्त्यांबाबतचा गंभीर प्रश्न समोर आला. या प्रकरणावरून एमपीएससीचे इतर परीक्षार्थी आणि विरोधकांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. स्वप्निलने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात आपल्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे म्हटले होते. त्यावर आता भाजपाने स्वप्निलच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची परतफेड करत आर्थिक मदत केली आहे.

एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून स्वप्निलने आत्महत्या केली होती. दरम्यान भाजपने लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. भाजपच्या वतीने लोणकर कुटुंबियांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते लोणकर कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. स्वप्निलचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा कर्जाच्या रकमेचा धनादेश देण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे लोणकर कुटुंबीयांवर कर्ज होते. यावेळी लोणकर कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीचे आभार मानलेत.

Updated : 22 July 2021 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top