Home > Max Political > भाजप नेत्याच्या मारेकऱ्यास सुनावली फाशीची शिक्षा...!

भाजप नेत्याच्या मारेकऱ्यास सुनावली फाशीची शिक्षा...!

केरळ उच्च न्यायालयाने 20 जानेवारीला रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 आरोपींपैकी आठजणांचा हत्येत थेट हात असल्याचे आढळून आले. अन्य चार जण हत्येतील दोषी ठरले होते. याशिवाय तीन आरोपींना हत्येचा कट रचण्यामध्ये दोषी ठरवण्यात आले होते. कोर्टात आता 15 आरोपींवर हत्येचा आरोप सिद्ध झाला आहे.

भाजप नेत्याच्या मारेकऱ्यास सुनावली फाशीची शिक्षा...!
X


केरळ मधील भाजपचे ओबीसी नेते रंजित श्रीनिवासन यांची हत्या केल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने ३० जानेवारी २०२४ मंगळवारी १५ आरोपींना फाशींची शिक्षा सुनावली आहे. मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले कैदी हे केरळ राज्य सरकारने बंदी घातलेल्या प़ॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेचे सर्व सदस्य होते.

या संघटनेच्या सदस्यांकडून १९ डिसेंबर २०२१ साली रंजित श्रीनिवासन यांची केरळमधील आलाप्पुझा येथील राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यावेळी ते केरळमधील भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव होते.केरळ उच्च न्यायालयाने 20 जानेवारीला रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 आरोपींपैकी आठजणांचा हत्येत थेट हात असल्याचे आढळून आले. अन्य चार जण हत्येतील दोषी ठरले होते. याशिवाय तीन आरोपींना हत्येचा कट रचण्यामध्ये दोषी ठरवण्यात आले होते. कोर्टात आता 15 आरोपींवर हत्येचा आरोप सिद्ध झाला आहे.

श्रीनिवासन यांच्या हत्येतील दोषी पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया (PFI) संघटनेशी संबंधित आहेत. केरळातील स्थानिक कोर्टाने १५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. निजाम, अजमल, अनूप, मोहम्मद असलम, सलाम, अब्दुल कलाम, सफरुद्दीन, मुनशाद, जजीब, नवाज, शेमिर, नजीर, जाकिर हुसैन, शाजी आणि शमनाज अशी भाजप नेत्याच्या हत्येतील आरोपींची नावे आहेत.

Updated : 31 Jan 2024 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top