Home > Max Political > नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप नंबर वन, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप नंबर वन, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप नंबर वन, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
X

राज्यात दोन जिल्हा परिषदा आणि १०६ पैकी ९७ नगर पंचायतींच्या निवडणुकांचा निकाल बुधवारी घोषित झाला. या निवडणूक निकालांबाबत सर्वच पक्ष वेगवेगळे दावे करत आहेत. पण यासर्व निकालांमध्ये पुन्हा एकदा भाजप नंबर वन झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे.

"मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्य संख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो! कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.मा. मोदीजींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे.या यशाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!" असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे भाजचपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजप नंबर असल्याचा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी जिथे त्रिशंकू स्थिती आहे तिथे भाजपचे स्थानिक नेते योग्य पद्धतीने काम करुन सत्ता स्थापन करतील असाही दावा त्यांनी केला. तसेच शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सारे काही देऊन टाकले आहे, असा टोलाही देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच "जनादेश विधानसभा निवडणुकीतही भाजपालाच होता, हे आम्ही सांगत होतो. आज निकालांतूनही ते पुन्हा स्पष्ट झालंय. अपेक्षेनुसार सर्वाधिक 417 जागा जिंकणारा पक्ष भाजपाच ठरलाय. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल आले, तिथे आत्मपरीक्षण करूच. नगर पंचायतींत आम्हाला भरभरून मतं देणाऱ्या मतदारांचे आभार!!!" असेही त्यांनी म्हटले आहे.

Updated : 19 Jan 2022 5:25 PM IST
Next Story
Share it
Top