Home > Max Political > महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यात कमी पडलो- फडणवीस

महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यात कमी पडलो- फडणवीस

महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यात कमी पडलो- फडणवीस
X

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद आमच्या लक्षात आली नाही, अशी स्पष्ट कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे लागले असेही त्यांनी सांगितले. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली.

या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. परंतु आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे.

त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू, असे त्यांनी सांगितले. पण ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.



Updated : 5 Dec 2020 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top