Home > Max Political > पदवीधर निवडणूक, भाजपची डोकेदुखी आणखी वाढली

पदवीधर निवडणूक, भाजपची डोकेदुखी आणखी वाढली

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला बंडखोरांचे आव्हान निर्माण झालेले असताना आता मित्रपक्षांनी भाजपची चिंता आणखी वाढवली आहे.

पदवीधर निवडणूक, भाजपची डोकेदुखी आणखी वाढली
X

पदवीधर निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या भाजपला धक्या मागून धक्के सुरूच आहे. सोमवारी मीडियाची हेडलाईन गाजवणाऱ्या सदाभाऊ खोत यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांना आणखी एका मित्रपक्षाने इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

पदवीधर निवडणुकीवरून भाजपसोबत असलेल्या विनायक मेटे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने "भाजप शिवसंग्रामला विचारात घेत नसून भाजपच्या काही नेत्यांना मराठवाड्याचं सीट पाडायचा आहे का ?" असा सवाल करत, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी भाजपला इशारा दिला आहे. तर याचं स्पष्टीकरण खुद्द चंद्रकांत पाटील यांनी द्यावं, अशी मागणी देखील मेटे यांनी केलीय. तसेच येत्या 25 तारखेपर्यंत शिवसंग्रामला विचारात न घेतल्यास स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशाराही विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे आधीच बंडखोरीने अडचणीत आलेल्या भाजपला आता मित्र पक्षांनी वेगळा विचार करण्याचा इशारा दिला असल्याने, त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

जयसिंग गायकवाड आणि रमेश पोकळे यांनी भाजपच्या विरोधात थेट भूमिका घेतल्याने भाजपला पदवीधर निवडणुकीत आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच आता विनायक मेटे यांनीसुद्धा आपली नाराजी उघडपणे बोलवून दाखवली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय पर्याय काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 18 Nov 2020 1:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top