Home > Max Political > भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा: भाजपची मागणी

भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा: भाजपची मागणी

इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह कार्यकर्ते बैलगाडीवरून पडल्यानंतर आता भाजपने त्यांच्या विरोधात तक्रार केल्याने आणखी अडचणीत सापडले आहेत.

भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा: भाजपची मागणी
X

भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांनी थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबई येथे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडीवर मोर्चा काढण्यात आला. या बैलगाडीवर स्वतः आ. भाई जगताप त्यांच्या सोबत 21 कार्यकर्त आरूढ झाले. फोटे सेशन करण्याकरिता व नारे देण्याकरिता बैलगाडीच्या समोरच्या भागात 21 कार्यकत्यांच्या किमान 21 क्विंटल वजन बैलांच्या मानेवर असलेल्या जू टवर पडत होते. त्यातच ही घोषणा देतांना कार्यकत्यांच्या पायाची होणारी हालचाल बेलवंडीवर व आपली सुटका बेलाच्या गळ्यापासून निघालेला कासरा बैलबंडी थांबविण्याकरिता घट्टपणे पकडून ठेवलेला होता. सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडीओ मध्ये बैलाचा जीव असलेले वजन न पेलल्यामुळे कासावीस होऊन दोन्ही न होण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. बैलांच्या या धडपडीमुळे गळवाचा फास अधिकच घट होत असल्याचे दिसत आहे. सरते शेवटी त्यामधील एक बैल मोडला (बैल खाली बसला) त्यामुळे बैल गाडीचे भाग तुटायला लागले. बैल गाडीवर उभे असलेले आ. जगताप व इतर कार्यकर्ते खाली आपटले व दुर्दैवाची बाब की बैलांना झालेल्या इजा, दुखापतीकडे न पाहता निर्लजणे हसायला लागले. ही सर्व घटना व्हिडीओमधून दिसत असून शेतकऱ्यांच्या माणसाच्या हृदयाला पिळवटून टाकणारी व चीड आणणारी आहे.

The prevention of cruelty act. 1960 प्रमाणे बैलगाडीवर किंवा जनावरावर जास्त वजन लादणे या माणसाने केलेल्या कृतीमुळे जनावरास दुखापत इजा होत असल्यास या कायद्याद्वारे दखलपात्र गुन्हा भारतीय संविधानाप्रमाणे आहे. वरील अक्ट च्या Chapter III सेक्शन 11 (1) प्रमाणे Treating animals cruelly. Over load, over rides हे सुद्धा cruelty मध्ये अंतर्भूत आहे. या कायद्या अंतर्गत 75 हजार रुपयांचा दंड व 5 वर्षाचा सश्रम कारावास या शिक्षेचे प्रावधान आहे.

मुंबई येथील आ. भाई जगताप व इतर 21 यांनी केलेला गुन्हा गंभीर असून त्यामुळे दोन्ही बैलाला इजा झाली आहे. व दोन्ही बलावर अतोनात अत्याचार केला आहे. त्यामुळे आ. जगताप व इतर कार्यकर्त्याांवर गुन्हा दाखल करून अटक करावी असे भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बांडे यांनी शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली आहे. वरील विनंती पत्र गुन्हा नोंदविण्याकरिता एफ. आय. आर. साठी वापरण्यास यांची काहीही हरकत नाही, डॉ. अनिल बोंडे या पत्रात म्हटले आहे.

Updated : 12 July 2021 1:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top