Home > Max Political > मोदींच्या पारदर्शकतेचा केवळ देखावा: भाजपचा मोठा भ्रष्टाचार

मोदींच्या पारदर्शकतेचा केवळ देखावा: भाजपचा मोठा भ्रष्टाचार

मोदींच्या पारदर्शकतेचा केवळ देखावा: भाजपचा मोठा भ्रष्टाचार
X

गेल्या काही वर्षात देशात अनेक मोठ्या घोटाळ्यांची मालिका समोर येत आहे. तर गुजरातमध्ये ABG शीपयार्ड कंपनीने बँकांना 22 हजार कोटींचा चूना लावला होता. त्यापाठोपाठ आता देशाला हादरवणारा आणखी एक मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे संजय निरूपम यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

देशात विविध बँकांमधील घोटाळ्यांची मालिका समोर येत आहे. त्यातच गुजरातमधील एबीजी शीपयार्ड कंपनीने केलेल्या महाघोटाळ्या पाठोपाठ आता आमटेक या कंपनीने घोटाळा देशाला हादरवणारा बँक घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेतून केला आहे.

काँग्रेस प्रवक्ते संजय निरूपम आणि पवन खेरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आमटेक या कंपनीने देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना संजय निरुपम यांनी आमटेक या कंपनीने विविध बँकांचे 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर या आमटेक कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यात आल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.

Amtek गृप ऑफ कंपनी काय आहे?

Amtek गृप ऑफ कंपनी ही ऑटो स्पार्ट्स आणि कास्टिंग टेक्नॉलॉजी बनवणाऱ्या या कंपनीचा विस्तार जगभरात असला तरी उत्तर भारतामध्ये ( दिल्ली, पंजाब, हरियाणा) या राज्यांमध्ये या कंपनीचे प्रस्थ आहे. तसेच बरिस्ता कॉफी हा ब्रँड या कंपनीचा प्रसिध्द ब्रँड आहे. मात्र या कंपनीने देशातील बँकांचे मोठे कर्ज बुडवल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी काँग्रेस प्रवक्ते संजय निरुपम यांनी बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडियाच्या माध्यमातून दिवाळखोरी जाहीर करणाऱ्या कंपन्याच्या प्रवर्तकांना सरकार आश्रय देत असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला. तसेच संजय निरुपम म्हणाले की, अमटेक गृप ऑफ कंपनीने भारतीय बँकांकडून 21 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. तर ते चार हजार शंभर कोटी रुपयांना विकल्याचा आरोप केला आहे. अशा प्रकारामुळे देशातील बँका दिवळखोरीत निघत आहेत. त्यामुळे ही देशातील बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांची मोठी फसवणूक आहे. मात्र या प्रकारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.

संजय निरुपम म्हणाले की, व्हिडीओकॉन असो, अलोक इंडस्ट्रीज यांच्या उद्योगपतींना सरकारने विचारायला हवे की, या कंपन्या सुरूवातीपासून चांगल्या चालत असताना या कंपन्यांनी आपला पैका कोठे वळवला आणि कंपन्यांचे कामकाज कसे चालले आहे? याबाबत माहिती घ्यायला हवी. अन्यथा या प्रकारचे उद्योगपती कंपन्या विकून स्टॉक फ्री होऊन फिरत आहेत.

यावेळी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सितारामण म्हणतात की, या कंपन्यांनी काँग्रेसच्या काळात कर्ज घेतले होते. पण कर्ज देणे हा गुन्हा नाही. मात्र दिलेले कर्ज चुकते करण्याऐवजी ते वळते करण्याचे पाप मोदी सरकार करत आहे, असा आरोप पवन केरा यांनी केला. तर दिवाळखोरीच्या नावाखाली संस्थात्मक भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला.

या वाढत्या बँकांच्या घोटाळ्यांमुळे सरकारने श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर गेल्या 5 वर्षात 4 हजार 946 दिवाळखोरीची प्रकरणे समोर आली आहेत. ज्यापैकी 457 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे काँग्रेसने पत्रकार परिषदेत म्हटले आहे.


Updated : 27 March 2022 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top