Home > Max Political > अमरावतीत भाजपाला मोठा झटका , महाविकास आघाडीचे धीरज लिंगडे विजयाच्या उंबरठ्यावर

अमरावतीत भाजपाला मोठा झटका , महाविकास आघाडीचे धीरज लिंगडे विजयाच्या उंबरठ्यावर

अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगडे पाटील यांनी आघाडी घेतली आहे. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय निश्चित मानला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासु डॉ. रणजित पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

अमरावतीत भाजपाला मोठा झटका , महाविकास आघाडीचे धीरज लिंगडे विजयाच्या उंबरठ्यावर
X

अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगडे पाटील यांनी आघाडी घेतली आहे. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय निश्चित मानला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासु डॉ. रणजित पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

राज्यात मागील काही दिवसापासुन पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे . या निवडणुकीसाठी ३० जानेवारी रोजी मतदान पार पडले . या निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला ,महाराष्ट्रातील सर्व जागाचे निकाल आले परंतु अमरावती पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरु होती . अखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे निश्चित झाले आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांनी आघाडी घेतली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भाजपच्या डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे . अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत धीरज लिंगडे आणि भाजपाकडुन डॉ. रणजित पाटील यांच्यात थेट लढत होती . या निवडणुकीसाठी एकुण 23 उमेदवार रिंगणात होते.मतमोजणी केंद्रावर गुरूवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या पसंतीच्या मतमोजणी अखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते मिळाली होती. तेव्हा लिंगडे २ हजार ३१३ मतांची आघाडीवर होते. एकुण मतांची संख्‍या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्‍याने विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता.या निवडणुकीत धीरज लिंगाडे यांना एकूण 46344 मतं पडली, तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 42962 मत मिळाली. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय निश्चित मानला जात आहे .थोड्याच वेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान डॉ. रणजित पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासु मानले जातात . त्यांचा पराभव हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Updated : 3 Feb 2023 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top