Home > Max Political > भैय्या पाटलांचा जरांगेना रोखठोक सवाल

भैय्या पाटलांचा जरांगेना रोखठोक सवाल

भैय्या पाटलांचा जरांगेना रोखठोक सवाल
X

लेखक - लेख भैय्या पाटील यांच्या

एक्स पोस्टवरुन साभार

जो अध्यादेशाचा मसुदा आमदार बच्चू कडू यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हातात आणून दिला होता. या मसुद्यातील शब्द न शब्द मनोज जरांगे यांनी वाचून पाहिला आहे. हे सर्वत्र लाईव्ह टेलिकास्ट झालेले आहे. तरीही वाशीला आंदोलन घेऊन जाण्याचा त्यांनी घाट घातला.. वाशीला जो विजयी जल्लोष त्यांनी घेतला तो जरांगे पाटील यांना लोणावळा येथेच करायचा होता. त्यामुळे त्यांनी एक दिवस लोणावळा येथे घालवला पण मुख्यमंत्री महोदय यांना लोणावळा येथे येता आले नसल्याने ते वाशीत आले आणि मुख्यमंत्री यांच्याकडून अंतरवली सराटी येथे अगोदरच भेटलेला अध्यादेश स्वीकारला. जरांगे पाटील यांनी विचारवंत अभ्यासक यांनी या अध्यादेशाच्या चर्चेसाठी यावे असे आवाहन केले पण जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील कोणत्याही अभ्यासक विचारवंत यांच्याशी चर्चा केली नाही, रात्री एक पर्यंत ते मीडियाला बाईट देत बसले. नंतर त्यांनी सर्वाना हाकलून देऊन सरकारच्या प्रतिनिधीशी बंद दारा आड बैठक घेऊन रात्री 3 वाजता अशा अवेळी ड्राफ्ट स्वीकारला व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगून मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ड्राफ्ट स्वीकारून उद्या सकाळी गुलाल उधळायचे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री महोदय यांच्या समोर त्यांनी मराठ्यांचा मोठा विजय झाला.. आरक्षणासारखा किचकट प्रश्न मी कसा चुटकीसरशी सोडवला हे लोकांना सांगितले.. गावागावात दिवाळी साजरी करायला लावली.. मसुद्याची वेळ डायरेक 16 फेब्रुवारी ची देऊन टाकली.. यातून काही प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरे जरांगे पाटील देणार नाहीत कारण ते हेकेखोर आहेत, अभ्यासू लोकांचे त्यांना ऐकायचे नाही, त्यांच्या या स्वभावामुळे सुरवातीपासूनचे अनेक अभ्यासू लोकं त्यांच्यापासून बाजूला गेले आहेत. त्यांच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी देवाला ही झुकवले आहे(बाईट पहा तिचा तिने स्पष्ट सांगितले की देवाला ही झुकवणारे तिचे पपा आहेत) त्यामुळे सर्वसामान्य मराठा आणि अभ्यासक यांच्याशी ते चर्चा करत नाहीत..पण समाजाने आपल्या तोंडात मारून घेऊन स्वतःला हे प्रश्न नक्की विचारून विचार करावा..

1) अध्यादेश अंतरवली सराटी येथे आमदार कडू यांनी दिला असताना समाजाला वाशी पर्यंत आणून समाजाची मोठी ताकद खर्ची का घातली ?

2) अध्यादेश जरी मिळाला तरी आजाद मैदानात गुलाल उधळू म्हणणाऱ्या जरांगे पाटील यांनी वाशीतूनच पळ का काढला?

3) समाजासमोर मीडियासमोर बैठका घेणारे जरांगेपाटील यांनी बंद दारा बैठका घेतल्या त्या बैठकात काय असे घडले की त्यांनी समाजाची फरपट केली..

4) जरांगे पाटील यांच्यावर कोणाचा दबाव होता की ते सारखे खोटे बोलले (सरसकट ओबीसी आरक्षण, मुंबईला गुलाल उधळू, अंतरवाली सराटीत भेटलेला जीआर वाशीत घेतला)

5. वाशीत मराठा समाजाची एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केली हे मनोज जरांगे जाहीर सांगतील का ?

6. वाशीत जल्लोष झाल्यावरच चारच दिवसात पुन्हा उपोषणाला का बसले ? कोणा समाज बांधवाला विचारले का ? आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सगळ्यांना बोलावता अन स्वतःच एकट्याने कसे निर्णय घेता ?

एवढ्या मोठया समाजाचे तुम्ही जेव्हा नेतृत्व करत आहात, तेव्हा जिभेवर ताबा ठेवून अभ्यासूपणे बोलणे गरजेचे, कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर यांना अश्लाघ्य शिव्या देण्याचा प्रकार मला तरी आवडलेला नाही. दारावर आलेल्या पाहुण्याला पाणी देणे हि आपली संस्कृती, अधिकार्यांना शिव्या देणे हि मराठ्यांची संस्कृती नाही.

Updated : 21 Feb 2024 5:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top