Home > Max Political > बीड: पुतण्याने काकांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला लावला सुरुंग, पंकजा मुंडेना मोठा धक्का

बीड: पुतण्याने काकांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला लावला सुरुंग, पंकजा मुंडेना मोठा धक्का

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीतील जयदत्त क्षीरसागर यांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी सुरुंग लावला आहे.

बीड: पुतण्याने काकांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला लावला सुरुंग, पंकजा मुंडेना मोठा धक्का
X

बीड: कृषी उत्पन्न बाजार समिती मधील 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काकांना धोबीपछाड दिली आहे. 18 पैकी 15 जागांवर त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जयदत्त क्षीरसागर गटाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. आ. संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी या पाच पक्षांची मोट बांधत यशस्वी झुंज दिली.

गेवराई कृ.ऊ. बाजार समितीत भाजपाचा सुपडा साफ

प्रतिष्ठित बीडच्या गेवराई बाजार समितीवर राष्ट्रवादीला यश प्राप्त झाले असुन 18 जागापैकी 18 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवली आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक

केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात. ग्रामपंचायत मतदार संघातील ४ पैकी ४ जागांवर बजरंग बप्पा सोनवणे यांना यश मिळाले आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती

केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत-१८ पैकी १४ जागा मुंदडा-आडसकर गटाचे सर्व उमेदवार विजयी...

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना धक्का.

आंबेजोगाई बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून भाजपने ते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या आंबेजोगाई समितीमध्ये राष्ट्रवादीने 18 जागापैकी 15 जागा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर केवळ 3 जागावर भाजप विजयी.

Updated : 29 April 2023 8:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top