Home > Max Political > 10 तारखेला अजित पवारच्या राष्ट्रवादीत बाबा सिद्दीकी यांचा होणार प्रवेश

10 तारखेला अजित पवारच्या राष्ट्रवादीत बाबा सिद्दीकी यांचा होणार प्रवेश

10 तारखेला अजित पवारच्या राष्ट्रवादीत  बाबा सिद्दीकी यांचा होणार प्रवेश
X

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची न्याय यात्रा सुरू झाली, त्याच दिवशी मुंबईतील काँग्रेसचा एक नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाला. आता राहुल गांधी मुंबईत पोहोचण्यापूर्वी काँग्रेसला दुसरा झटका बसणार आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार गटातील नेत्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.


बाबा सिद्दीकी यांचा 10 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांच्या उपस्थित सिद्दीकींचा हा प्रवेश होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.मुंबईमध्ये या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे असल्याचं कळतंय पण बाबा सिद्दीकी व त्यांचा मुलगा यांचं १० फेब्रुवारीला प्रवेश होणार असल्याचं कळतंय तर राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा अजित पवार गटात सुरु झाल्याचं दिसतंय आगामी राज्यसभेच्या उमेदवारीची संधी बाबा सिद्दीकी यांना मिळू शकते.

Updated : 2 Feb 2024 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top