Home > Max Political > अटलबिहारी वाजपेयी यांचा विश्वासू नेता देणार ममता बॅनर्जीना साथ...

अटलबिहारी वाजपेयी यांचा विश्वासू नेता देणार ममता बॅनर्जीना साथ...

अटल बिहारी वाजपेयींचा विश्वासू नेता देणार ममता बॅनर्जीला साथ, भाजपला मोठा झटका, कोण आहे हा मोठा नेता?

अटलबिहारी वाजपेयी यांचा विश्वासू नेता देणार ममता बॅनर्जीना साथ...
X

अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आणि अर्थ मंत्री यासारख्या महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या यशवंत सिन्हा यांनी (Yashwant Sinha) ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये टीएमसी (TMC) प्रवेश केला आहे. 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकला होता.

कोलकाता येथे त्यांनी ममता बॅनर्जी यांना साथ देण्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले...

देशासमोर आज मोठं अभूतपूर्व असं संकट आहे. लोकशाहीतील संस्थांनी लोकशाही मजबूत होते. न्यायपालिकेसह या सर्व संस्था कमजोर झाल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला त्यांच्यासाठी मर्यादा ओलांडणारा होता. तेव्हा त्यांनी टीएमसीमध्ये सहभागी होऊन ममता बॅनर्जी यांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजप सर्वांच्या सहमतीवर विश्वास ठेवत असे. मात्र, सध्याचं सरकार दुसऱ्यांना दाबण्यावर आणि जिंकण्यावर विश्वास ठेवतं. अकाली आणि बीजेडी यांनी भाजपची साथ का सोडली. आता भाजपसोबत कोण उभा आहे?

असा सवाल सिन्हा यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

यशवंत सिन्हा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांचे वडील आहेत. जयंत सिन्हा हे मोदी सरकार च्या पहिल्या कार्यकाळात नागरी उड्डाण खात्यात (Civil Aviation) आणि अर्थमंत्रालयात राज्य मंत्री पदावर होते.

यातच यशवंत सिन्हा यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर TMC मध्ये

प्रवेश केल्याने भाजपला मोठा झटका बसला आहे. सध्या जयंत सिन्हा हे हजारीबाग येथून खासदार आहे.

2018 मध्ये भाजपमधून बाहेर पडल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी अनेक वेळा भाजपच्या आर्थिक धोरणांवरून तसंच राजकीय प्रकरणावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर असहमती दाखवली आहे. या संदर्भात 'Atalद क्विंट' ने वृत्त दिलं आहे.

Updated : 13 March 2021 11:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top