Home > Max Political > आसाम मध्ये ' कॅांग्रेसला अच्छे दिन' आणण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर

आसाम मध्ये ' कॅांग्रेसला अच्छे दिन' आणण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर

आसाम मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. प्रत्येक पक्षाने निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. काॅंग्रेसनेही या निवडणूकीत आसाम मध्ये अच्छे दिन आणण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आसामची जबाबदारी दिली आहे.

आसाम मध्ये  कॅांग्रेसला अच्छे दिन आणण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर
X

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यांतर पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी झाले की काय अशी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत आसाम निवडणुकीसाठी (Assam elections) त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

निवडणूक आयोगाने नुकतंच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक तारखांची घोषणा केली. यामध्ये आसामचाही समावेश आहे.

काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल आणि दीपिका पांडे सिंह या समितीच्या सदस्या असतील.

आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.


मागील निवडणुकीचा निकाल

आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांवर निवडणूक होत आहे. 2016 मध्ये 86 जागांवर घवघवीत यश मिळवून भारतीय जनता पार्टीने आसाममध्ये आपलं सरकार बनवलं होत. मात्र, काँग्रेसला 26 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

दरम्यान, मागील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलेलं असल्याने आसाममध्ये पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन आणण्याचं मोठं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर असणार आहे. हे आव्हान ते कसं पेलतात. यावरच काँग्रेस पक्षाची मदार असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Updated : 2 March 2021 4:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top