Home > Max Political > असीम सरोदे यांचा गुप्त लंडन दौरा, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या चर्चांना उधाण

असीम सरोदे यांचा गुप्त लंडन दौरा, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर वेगाने घडामोडी घडत असतानाच ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांच्या गुप्त लंडन दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

असीम सरोदे यांचा गुप्त लंडन दौरा, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या चर्चांना उधाण
X

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष रंगलाय. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे ठाकरे गटाच्या वतीने असीम सरोदे युक्तीवाद करत आहेत.

सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतानाच ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे हे एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यावेळी त्यांना कुठे जात आहात हे विचारले असता त्यांनी लंडनला जात असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना कशासाठी विचारण्यात आले. तर असीम सरोदे यांनी ऑफिशियल कामासाठी जात असल्याचे सांगितले.

एकीकडे सत्तासंघर्षात शिंदे गटाची बाजू जोरदारपणे मांडणारे वकील हरीश साळवे हे लंडनहून काम करत आहेत. अशा वेळी असीम सरोदे यांची लंडनवारी चर्चेचा विषय बनली आहे.

Updated : 15 Oct 2023 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top