Top
Home > Max Political > "स्वबळाची छमछम जोमात"; आ. आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर टीका

"स्वबळाची छमछम जोमात"; आ. आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर टीका

स्वबळाची छमछम जोमात; आ. आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर टीका
X

पिंपरी चिंचवड // "शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण असे एक ना अनेक प्रश्न राज्यासमोर असताना. सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात, असं म्हणत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास सरकारवर जोरदार टिका केली. ते आज (21 जुलै) पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी बोलत होते.

"स्वबळाची छमछम जोमात"

यावेळी पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, सध्या राज्यात सत्तेत असलेल्या तिनही पक्षांची केवळ एकच चर्चा सुरू असते ती म्हणजे "आम्ही स्वबळावर लढणार". राज्याला एवढे गंभीर प्रश्न भेडसावत असताना एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरे त्यावर अग्रलेख लिहिणार, मग तिसरे दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटणार. ही अशी सगळी स्वबळाची छमछम सध्या राज्यात सुरू आहे. असं शेलार यांनी म्हटले आहे.

Updated : 2021-07-21T21:45:41+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top