Home > Max Political > अटकेच्या धमकीचं भांडवल, समीर वानखेडेंनी केली मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

अटकेच्या धमकीचं भांडवल, समीर वानखेडेंनी केली मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

Aryan Khan drugs case NCB's Sameer Wankhede writes to Mumbai Police Commissioner, seeks protection from action on 'false charges'

अटकेच्या धमकीचं भांडवल, समीर वानखेडेंनी केली मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी
X

आर्यन खान प्रकरणात आज नवीन माहिती समोर आली आहे. आर्यन खान केस प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी चा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला आहे.

या दाव्यानंतर आता NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशीसह त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केली आहे. या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे अडचणीत आल्याचे दिसत आहे. याबाबत आता एनसीबीकडून प्रसिध्दीपत्रक देण्यात आले असून यासंबधीच्या आरोपाच्या तपासासाठी संबधीत प्रकरण महासंचालक, एनसीबी यांना पाठविण्याचा निर्णय विभागीय महासंचालक मुथा अशोक जैन यांनी घेतल्यानंतर आता समीर वानखेडे यांनी यावर मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहित त्यांच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या या प्रतिक्रियांचं भांडवल करत सुरक्षेची मागणी केली आहे.

काय म्हटलं पत्रात?


'मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात. असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे.

अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर आरोपींना पकडण्यात आल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईलनं एका व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे.

क्रूझवरील छाप्यावेळी २ ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक १ चा साक्षीदार आहे.

Updated : 24 Oct 2021 4:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top