Home > Max Political > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भगत सिंह कोश्यारी यांच्या भेट; १२ आमदारांचा तिढा सुटणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भगत सिंह कोश्यारी यांच्या भेट; १२ आमदारांचा तिढा सुटणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भगत सिंह कोश्यारी यांच्या भेट; १२ आमदारांचा तिढा सुटणार का?
X

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गेल्या 11 महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्यसरकारने 12 व्यक्तींच्या नावाची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. या १२ नावांमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्या नावावरच भगतसिंह कोश्यारी यांचा आक्षेप आहे. त्यामुळे खडसे यांचं आता काय होणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपालांकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान काही दिवसांपूर्वी न्यायालयाने राज्यपालांना याबाबत खडसावले होते. राज्यपालांना न्यायालय आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही पण निर्णय घ्यावा लागेल, तो मुद्दा प्रलंबित ठेवता येणार नाही, या शब्दात कोर्टाने फटकारले होते.

कोर्टाच्या या आदेशानंतर गेल्या आठवड्यात राज्यपालांनी या विषयावर चर्चेची तयारी दाखवल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आपल्याला १२ आमदारांच्या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रण दिल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळं आज तरी यावर निर्णय घेतला जाणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

विधानपरिषद रचना...

भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 (1) मध्ये परिषदेच्या निर्मिती संदर्भात तरतूद करण्यात आली आहे. तर भारतीय संविधानात अनुच्छेद 168, 169 आणि 171 मध्ये विधानपरिषदेचं अस्तित्व आणि रचनेबाबत तरतूदी आहेत.

सदस्य संख्या

कलम 171 नुसार किमान ४० किंवा विधानसभेच्या एक तृतियांश सदस्य विधानपरिषदेत असू शकतील अशी संविधानिक तरतूद आहे.

कायम स्वरुपी सभागृह

दर दोन वर्षांनी दोन तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवीन सभासद निवडले जातात. हे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातून विधानपरिषदेत येतात. विधानपरिषद कधीही बरखास्त होत नाही. त्यामुळे या सभागृहाला कायम स्वरुपी सभागृह म्हणतात.

1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

कार्यकाळ

विधान परिषदेतील सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.


Updated : 1 Sep 2021 4:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top