Home > Max Political > अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांचा नंबर – किरीट सोमय्या

अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांचा नंबर – किरीट सोमय्या

अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांचा नंबर – किरीट सोमय्या
X

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. मुंबई आणि नागपूर इथल्या घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पण आता या कारवाईवरुन भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट शिवसेनेला टार्गेट केले आहे. त्यांनी ट्विट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "अनिल देशमुखचा घरी आज ED ई डी चे छापे काही दिवसांनी जेल मधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार"

सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील असा दावा वारंवार भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्या घरांवर आता छापे पडले आहेत, पण लवकरच ते तुरुंगात जाणार असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचीही अशीच अवस्था होईल असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्यावर ही कारवाई होते का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 25 Jun 2021 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top