Home > Max Political > बार मालकांकडून मिळालेले 4 कोटी अनिल देशमुखांनी बनावट कंपन्यांद्वारे वळवले, ईडीचा कोर्टात दावा...

बार मालकांकडून मिळालेले 4 कोटी अनिल देशमुखांनी बनावट कंपन्यांद्वारे वळवले, ईडीचा कोर्टात दावा...

बार मालकांकडून मिळालेले 4 कोटी अनिल देशमुखांनी बनावट कंपन्यांद्वारे वळवले, ईडीचा कोर्टात दावा...
X

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील काही बारमालकांकडून ४ कोटी रुपये मिळाले होते असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. तसेच बनावट कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी ही रक्कम आपल्या ट्रस्टकडे वर्ग केल्याचा दावा ईडीने कोर्टात केला आहे.

ईडीने शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर इथल्या घरांवर छापे टाकले होते. १० ते १२ बारमालकांकडून जबाब नोंदवले असल्याचे ईडीने सांगितले आहे. तसेच तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेचाही जबाब नोंदवल्याचे ईडीने सांगितले.

ईडीने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांचे पीए आणि पीएस पलांडे आणि शिंदे या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये ईडीने कोर्टात ही माहिती दिली आहे. कोर्टाने या दोघांना 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. या दोघांनी अनिल देशमुखांना पैशाच्या गैरव्यवहारात मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

ईडीने शनिवारी अनिल देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. परंतु देशमुख यांनी हजर होण्यासाठी नवीन तारखेची मागणी केली आहे. तसेच चौकशी संदर्भात कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता.

Updated : 27 Jun 2021 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top