News Update
Home > Max Political > " इस शहर में मिल ही जाएँगे…."अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर पुन्हा वार !

" इस शहर में मिल ही जाएँगे…."अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर पुन्हा वार !

 इस शहर में मिल ही जाएँगे….अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर पुन्हा वार !
X

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर वार केला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अऩेक ठिकाणी पाणी भरले आहे. तर रस्त्यांवरही खड्डे झाले आहेत. याच मुद्द्यांवरुन आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्या पाण्याखाली गेलेल्या एका रस्त्यावर उभ्या आहेत आणि रस्त्यावरील पाणी दाखवत आहेत, अशा स्वरुपाचा त्यांचा फोटो आहे. त्या फोटोसोबत त्यांनी

"इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !"

अशा काही ओळी लिहिल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यापासून अमृता फडणवीस या सातत्याने सोशल मीडियावरुन शिवसेनेला टार्गेट करत असतात. मुंबई प्रत्येक रस्त्यावर खड्डे आणि पाण्याचे तलाव सहज सापडती, पण एकही गुन्हेगार सापडू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंग प्रकरणावरुनही शिवसेनेवर टीका केली होती. "सुशांत सिंगच्या मृतत्युचे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले ते पाहता मुंबईन माणुसकी गमावली आहे आणि निष्पाप तसेच स्वाभिमानी लोकांसाठी मुंबईत आता सुरक्षित नाही" अशी गंभीर टीका केली होती. आता पुन्हा मुंबई महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा लगावला आहे.

Updated : 16 July 2021 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top