Home > Max Political > चंद्रकांत पाटील विरुध्द संजय राऊत खडाजंगी

चंद्रकांत पाटील विरुध्द संजय राऊत खडाजंगी

राज्यात भाजप शिवसेनेतील संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदी फक्त दोनच तास झोपतात या वक्तव्याचा शिवसेनेचे मुखपत्र सामनातून समाचार घेण्यात आला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना थेट शिवसेनेला इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटील विरुध्द संजय राऊत खडाजंगी
X

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष वाढत आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दोनच तास झोपत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून चंद्रकांत पाटील यांना टोमणे मारले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया देतांना थेट शिवसेनेला इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, यशवंत जाधव यांच्याकडे अशी डायरी सापडली की नाही माहिती नाही. पण मला इतकंच दिसत आहे की यातून खूप मोठं काहीतरी होणार आहे. तसेच संजय राऊत यांच्याकडून माझी चेष्टा केली जाते. मात्र एक दिवस ही चेष्टा अंगावर येईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना इशारा दिल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत ट्वीट करून म्हणाले की, नव्या धमकीबद्दल धन्यवाद. महाग पडेल म्हणजे? ईडी पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर, असा सवाल केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत तुम्ही जी भाषा वापरता, चेष्टा करता ते सहन करायचे? असे म्हणत शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडली आहे हा अनुभव आपण घेतला आहे, असा टोला संजय राऊत यांनी ट्वीट करून लगावला आहे.

Updated : 27 March 2022 7:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top