Home > Max Political > कोणता कारखाना कितीला विकला, अजित पवारांचे किरिट सोमय्या यांना उत्तर

कोणता कारखाना कितीला विकला, अजित पवारांचे किरिट सोमय्या यांना उत्तर

कोणता कारखाना कितीला विकला, अजित पवारांचे किरिट सोमय्या यांना उत्तर ajit pawar give answer to kirit somaiya release list of sugar factory sales

कोणता कारखाना कितीला विकला, अजित पवारांचे किरिट सोमय्या यांना उत्तर
X

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन किरिट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर दिली. मात्र, हे उत्तर देताना अजित पवार यांनी फक्त मी अशा प्रकार कारखाने खरेदी केले नाही तर बाकी लोकांनी देखील अशा प्रकारे कारखाने खरेदी केल्याची माहिती दिली आहे.

किरिट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्या संदर्भात सवाल उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात कोणते साखर कारखाने कोणत्या कंपन्यांनी खरेदी केले. याविषयी माहिती दिली.

जरंडेश्वर कारखाना कोणी आणि कधी विकत घेतला?

जरंडेश्वर कारखाना सर्वप्रथम मुंबईस्थित गुरु कमोडिटी कंपनीने विकत घेतला होता. त्यानंतर हा कारखाना बीव्हीजी समूहाच्या हणमंत गायकवाड यांनी विकत घेतला होता. त्यासाठी हणमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली होती. मात्र, तोटा झाल्याने त्यांनी हा कारखाना दुसऱ्या कंपनीला विकून टाकल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान यावेळी अजित पवार यांनी राज्यात कोणते कारखाने कधी विकले गेले आणि कोणत्या कंपनीने विकत घेतले यांची माहिती दिली.

पाहा काय म्हटलंय अजित पवार यांनी?

Updated : 22 Oct 2021 3:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top