Home > Max Political > पेपरात जाहिरात देऊन कार्यकर्त्यांनी मागितली अजित पवार यांची माफी...

पेपरात जाहिरात देऊन कार्यकर्त्यांनी मागितली अजित पवार यांची माफी...

पेपरात जाहिरात देऊन कार्यकर्त्यांनी मागितली अजित पवार यांची माफी...
X

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. काही माध्यमांनी टीव्ही माध्यमांवर जाहिरात दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्यात तर काहींनी वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात देऊन शुभेच्छा दिल्या आहे. या शुभेच्छांमध्ये एका जाहिरातीची खास चर्चा सुरु आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने त्यांची वर्तमानपत्रातून जाहीर माफी मागत शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेंच्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. घोषणाबाजीनंतर आजपर्यंत देशमुख यांच्याशी अजित पवार बोलले नाहीत.

नितिन देशमुख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पवार कुटुंबियांचे कट्टर समर्थक ओळखले जातात. पवारांविरुद्ध बोलणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांना देशमुख नेहमीच अंगावर घेत आले आहेत. पहाटेच्या शपथविधीनंतर नितिन देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.


नितिन देशमुख यांनी आज 'मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट', अशा आशयाची जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे.

आदरणीय दादा…

आम्ही अपराधी अपराधी

आम्हा नाही दृढ बुद्धी

तरी साहेबी पांघरले माझ्या चुकांवर पांघरुण

हात ठेवुनी मस्तकी आता द्यावा आशीर्वाद

अन् असावी आम्हावर मायेची पखरण

दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा…

तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा

23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या

दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली

दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे

पण दादा, आता सहन होत नाही

संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी

आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन

आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या..

एवढीच माफक अपेक्षा

– आपला कृपाभिलाषी नितीन हिंदुराव देशमुख

अजित पवारांनी केलं होतं आवाहन

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Updated : 22 July 2021 5:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top