Home > Max Political > स्थगिती सरकारने मागासवर्गीयांच्या हक्कांच्या निधीला कात्री लावली: राष्ट्रवादीचा आरोप

स्थगिती सरकारने मागासवर्गीयांच्या हक्कांच्या निधीला कात्री लावली: राष्ट्रवादीचा आरोप

विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने ( MVA) मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या ( Backword Class) हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस ( Eknath Shinde) ( Devendra Fadnavis)सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सरकारचा निषेध केला आहे.

स्थगिती सरकारने मागासवर्गीयांच्या हक्कांच्या निधीला कात्री लावली: राष्ट्रवादीचा आरोप
X

विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने ( MVA) मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या ( Backword Class) हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस ( Eknath Shinde) ( Devendra Fadnavis)सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सरकारचा निषेध केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात, ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून १० कोटी करण्यात आली याबाबींकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

Updated : 31 March 2023 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top