शरद पवार-अदानी भेटीनंतर वीज बिल सवलीचा निर्णय रद्द – राज ठाकरे
X
राज्यात सध्या लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांचा प्रश्न तापला आहे. पण आता राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकारने वीज बिल सवलतीचा निर्णय रद्द केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. वीज बिलासंदर्भात आपण राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यानी शरद पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला.
आपण यासंदर्भात शरद पवारांना संपर्क केल्यानंतर तुम्ही वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहा आणि मला पाठवा मी त्यांच्याशी बोलतो, असे शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले. पण त्यानंतर चार -पाच दिवसांनी अदानी पवार यांना भेटून गेल्याच समजले. याच भेटीनंतर राज्य सरकारने वीज बिल सवलतीचा निर्णय मागे घेतला असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. दरम्यान भाजपने वीज बिलांच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याआधी मनसेने हा मुद्दा उचलला होता, असे राज ठाकरे यांनी सुनावले.