Home > Max Political > Hardik patel Resign : चिंतन शिबीरापाठोपाठ काँग्रेसला धक्का, हार्दिक पटेलने दिला राजीनामा

Hardik patel Resign : चिंतन शिबीरापाठोपाठ काँग्रेसला धक्का, हार्दिक पटेलने दिला राजीनामा

राजस्थानच्या उदयपुरमध्ये नुकतेच काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबीरातील काँग्रेस कार्यकर्ते घरी पोहचत नाहीत तोच काँग्रेसला धक्का देत गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे.

Hardik patel Resign : चिंतन शिबीरापाठोपाठ काँग्रेसला धक्का, हार्दिक पटेलने दिला राजीनामा
X

पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी राजस्थानच्या उदयपुरमध्ये चिंतन शिबीर पार पडले. या शिबीरातून काँग्रेस कार्यकर्ते घरी पोहचत नाहीत तोच काँग्रेसला धक्का देत गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गुजरात काँग्रेसला धक्का देत पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे. तर हार्दिक पटेल यांनी राजीनाम्यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.

या ट्वीटमध्ये हार्दिक पटेलने लिहीले आहे की, हिंमत करून काँग्रेस पक्षातील पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तर माझे साथी आणि गुजरातचा प्रत्येक नागरिक माझ्या या निर्णयाचे स्वागत करील, असा मला विश्वास आहे. तसेच मला माहिती आहे की, माझ्या या पाऊलानंतर भविष्यात गुजरातसाठी सकारात्मक वृत्तीने कार्य करील, असे ट्वीट हार्दिक पटेल याने केले आहे.

आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY

— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022

यापुर्वी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर केली होती टीका

गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून कार्य करीत असताना आपल्याला डावलले जात असल्याचा आणि विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला होता. तसेच हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे की, देशाच्या युवकाला सक्षम आणि मजबूत नेतृत्व हवे आहे. मात्र काँग्रेस पक्ष हा केवळ विरोधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे. पण देशाच्या नागरिकांना विरोध करणारा नाही तर भविष्यासंबंधी विचार करणारे नेतृत्व हवे आहे.

हार्दिक पटेलने केले मोदींचे कौतूक

हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतूक केले. तसेच GST, NRC-CAA, कलम ३७० याबाबतीत काँग्रेसने भिजत घोंगडे ठेवले होते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी या प्रश्नांवर तोडगा काढला असल्याचे हार्दिक पटेल म्हणाला.


Updated : 2022-05-18T12:15:43+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top