Home > Max Political > अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंनी मोदींचा सल्ला घ्यावा- अभिनेत्री दिपाली सय्यद

अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंनी मोदींचा सल्ला घ्यावा- अभिनेत्री दिपाली सय्यद

अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंनी मोदींचा सल्ला घ्यावा- अभिनेत्री दिपाली सय्यद
X

अभिनेत्री दिपाली सय्यद सतत राजकीय भाष्य करत असते.किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत विधानाबाबत मोठा वादंग झाला होता.आता दिपाली सय्यदने राज ठाकरेंवर निशाना साधला आहे. नरेंद्र मोदींना खुश करण्याकरीता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला किंवा मदत घ्यावी.कदाचित माफीनाम्याची गरज पडणार नाही,असे ट्विट दिपाली सय्यदने केले आहे.

नुकतेच तिन मोदींच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केले होते. राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली होती. या घटनेचं समर्थन करताना त्या म्हणाल्या होत्या की,'जर या कारमध्ये सोमय्यांऐवजी पंतप्रधान मोदी जरी असते तरी ती कार शिवसैनिकांनी फोडली असती.'

गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली विचारधारा हिंदुत्वाकडे झुकवली आहे. त्यांच्या भाषणातून मनसे भाजपशी युती करणार की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर सडकून टिका होत आहे.

Updated : 11 May 2022 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top