Home > Max Political > केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात पुण्यात महागाई आंदोलन, पोलिसांनी केली कारवाई

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात पुण्यात महागाई आंदोलन, पोलिसांनी केली कारवाई

'हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा देत पुणे महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन केले. घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात पुण्यात महागाई आंदोलन, पोलिसांनी केली कारवाई
X

'हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा देत पुणे महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन केले. घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना काँग्रेसच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. पुणे शहर महिला काँग्रेसने देशातील वाढत्या महागाईच्या कारणावरून आंदोलन केले. देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. मात्र पोलिसांनी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाता मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्या आहेत. हे कळताच कार्यक्रमस्थळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पोहोचल्या, आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात 'हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योंकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.

देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. जनतेच्या प्रश्नांवर पोलिसांनी अशाप्रकारे शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत. असं यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद म्हणाल्या.

प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाला तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात आधीच बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायल्या उठल्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नलावडे यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांनं त्यांच्यावर हात उगारला. यानंतर पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

Updated : 16 May 2022 4:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top