Home > Max Political > जयंत पाटलांच स्वागत 'राजीनाम्या' ने...

जयंत पाटलांच स्वागत 'राजीनाम्या' ने...

जयंत पाटलांच स्वागत 'राजीनाम्या'ने... abhay patil resign during Jayant Patil's visit

जयंत पाटलांच स्वागत राजीनाम्या ने...
X

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते वैजापूर येथील विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेणार आहे. मात्र, त्यांच्या वैजापूर दौऱ्यावरपूर्वी विधानसभा निवडणुकीत पक्षाने आमदारकीची उमेदवारी दिलेल्या नेत्याने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जयंत पाटलांच स्वागत 'राजीनाम्या'ने अशी चर्चा पाहायला मिळत आहे.


२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असलेले अभय पाटील चिकटगावकर यांनी आपल्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील वैजापूर दौऱ्यावर असताना हा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अभय पाटील यांनी राजीनामा देताना आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. तर पक्षात सदस्य म्हणून पुढेही काम करत राहणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.




कोण आहेत अभय पाटील...

अभय पाटील चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे पुतणे तर दिवंगत नेते कैलास चिकटगावकर यांचे पुत्र आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून दोन्ही काका-पुतणे समोरा-समोर आले होते. मात्र पुढे हा आमचा कौटुंबिक प्रश्न असल्याचे सांगत आपल्या पुतण्याला उमेदवारी देण्याची मागणी भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पक्षाकडे केली होती. त्यामुळे हे काका-पुतण्याचे वाद चांगलेच चर्चेत आले होते.

Updated : 26 Sep 2021 6:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top