Home > Max Political > "आरती देशमुख यांना ED समोर हजर राहण्याची गरज नाही"

"आरती देशमुख यांना ED समोर हजर राहण्याची गरज नाही"

आरती देशमुख यांना ED समोर हजर राहण्याची गरज नाही
X

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या ED मार्फत चौकशी सुरू आहे. याप्रकरणी EDने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाख रुपयांनी मालमत्ता जप्त केली आहे. तसेच EDने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. पण आरती देशमुख या ED समोर हजर होण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. पण ही चर्चा चुकीची असल्याची माहिती आरती देशमुख यांचे वकील एडव्होकेट इंदरपाल बी.सिंग यांनी दिली आहे. तसेच आऱती देशमुख यांनी आपल्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे ED ने मागितलेली कागदपत्र सादर करावीत, अशी नोटीस EDने बजावली असल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे. तसेच त्याप्रमाणे सर्व कागदपत्र सादर करण्यात आली असून EDला चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करत असल्याची माहितीही सिंग यांनी दिली आहे.

Updated : 16 July 2021 4:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top