Home > Max Political > दिल्ली महानगरपालिकेवर आपचा झेंडा, भाजपला 104 तर AAP ला 134 जागा...

दिल्ली महानगरपालिकेवर आपचा झेंडा, भाजपला 104 तर AAP ला 134 जागा...

दिल्ली महानगरपालिकेवर आपचा झेंडा, भाजपला 104 तर AAP ला 134 जागा...
X

गेल्या 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेत (एमसीडी) सत्ता असलेल्या भाजपचा सुपडा साफ झाला आहे. आम आदमी पक्षाने (आप) येथे बहुमत मिळवले आहे. AAP ला MCD मध्ये 250 जागांसह 134 जागा मिळाल्या आहेत, ज्या बहुमतापेक्षा 8 जास्त आहे. दुसरीकडे भाजपने 104, काँग्रेसला 9 आणि अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे.

एमसीडीमध्ये आपच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे अभिनंदन केले आहे. पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने दिल्ली स्वच्छ करण्याची आणि भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी आपल्या मुलावर आणि भावावर दिली आहे. केंद्र सरकारचेही सहकार्य हवे आहे. पंतप्रधानांच्या आशीर्वादाचीही गरज असल्याचं ते म्हणाले...

काँग्रेसच्या 188, भाजपच्या 10 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

यावेळच्या एमसीडी निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी मागील निवडणुकीच्या तुलनेत खूपच खराब होती. यावेळी पक्षाच्या केवळ 9 उमेदवारचं विजयो होऊ शकले तर 188 उमेदवारांचे त्यांची डिपॉझिट रक्कमही वाचवता आली नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 30 जागांवर विजय मिळवला होता.

भाजपच्या मतांमध्ये 0.6%, आपच्या मतांमध्ये सुमारे 17% वाढ झाली आहे.

या निवडणुकीत आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये ०.६% वाढ झाली, पण त्यांच्या यंदा ७७ जागा कमी झाल्या. यावेळी पक्षाला ३९.०९% मते मिळाली, तर मागील निवडणुकीत ३९.०३% मते मिळाली होती. तसेच आम आदमी पार्टीच्या मतांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १७% वाढ झाली आहे. 'आप'ला यावेळी 42.05% मते मिळाली, तर मागील निवडणुकीत 25.08% मते मिळाली. दुसरीकडे, काँग्रेसला गेल्या वेळी 21.02% मते मिळाली होती, जी यावेळी 11.68% पर्यंत खाली आली. इतरांनी गेल्या वेळी 14.99% मतांसह 11 जागा जिंकल्या होत्या, परंतु यावेळी त्यांना 7.18% मतांसह केवळ 3 जागा जिंकता आल्या. तर एकूण 57 हजार 545 लोकांनी NOTA म्हणजेच 0.78% मतदान केले आहे.

मुहम्मद इक्बाल यांनी मतिया महल सर्वात जास्त मते घेऊन विजयी...

आम आदमी पक्षाचे आले मुहम्मद इक्बाल यांनी मतिया महल विधानसभेच्या चांदनी महल प्रभागातून १७ हजार १३४ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे. इक्बाल यांना 19 हजार 199 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मोहम्मद हमीद यांना 2 हजार 65 मते मिळाली.त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे आशु ठाकूर हे ग्रेटर कैलासच्या चित्तरंजन पार्क प्रभागातून अवघ्या ४४ मतांनी विजयी झाले.

Updated : 7 Dec 2022 5:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top