Home > Max Political > प्रचार न करताही पैकीच्या पैकी जागा जिंकणारा महाराष्ट्रातील नेता

प्रचार न करताही पैकीच्या पैकी जागा जिंकणारा महाराष्ट्रातील नेता

जामनेर(jamner) मध्ये महाविकास आघाडीने महाजन यांना पराभूत करण्यासाठी मोठी ताकद लावली होती.

प्रचार न करताही पैकीच्या पैकी जागा जिंकणारा महाराष्ट्रातील नेता
X

जळगाव(jalgoan) जिल्ह्यातील 12 पैकी 6 कृषी बाजार समितीचे निकाल लागले आहेत यात राज्याच लक्ष लागून असलेल्या मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan)यांचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप प्रणित पॅनल ला 18 पैकी 18 जागा मिळाले असून महाविकास आघाडीला खातेही उघडता आलं नाही. गिरीश महाजन यांच वर्चस्व आजही कायम आहे.विशेष म्हणजे गेले गेल्या 10 दिवसांपासून महाजन हे कर्नाटकच्या निवडणुकीत प्रचारासाठी गेले असल्याने एकही दिवस बाजार समितीच्या निवडणुच्या प्रचार केला नाही.ऐन निवडणुकीच्या टप्प्यात असतांना महाजन हे कर्नाटकात प्रचारासाठी आहेत. खालच्या कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली होती.

जामनेर(jamner) मध्ये महाविकास आघाडीने महाजन यांना पराभूत करण्यासाठी मोठी ताकद लावली होती.

गेल्या नगरपलेकीच्या निवडणुकीत पैकीच्या पैकी पैकी 100 टक्के जागा भाजप म्हणजेच महाजन यांनी जागा निवडून आनल्या होत्या. बाजार समितीतही महाजन यांनी पुनरावृत्ती करत 100 टक्के जागा मिळवल्या.मंत्री गिरीश महाजन यांनी आपलं पुन्हा एकदा जामनेर मध्ये वर्चस्व सिद्ध केलंय.जामनेर(jamner) मध्ये महाविकास आघाडीने महाजन यांना पराभूत करण्यासाठी मोठी ताकद लावली होती.

Updated : 29 April 2023 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top