Top
Home > Max Political > प.बंगालमध्ये ममता आघाडीवर, आसाममध्ये भाजप तर केरळमध्ये डाव्यांची बहुमताकडे वाटचाल

प.बंगालमध्ये ममता आघाडीवर, आसाममध्ये भाजप तर केरळमध्ये डाव्यांची बहुमताकडे वाटचाल

प.बंगालमध्ये ममता आघाडीवर, आसाममध्ये भाजप तर केरळमध्ये डाव्यांची बहुमताकडे वाटचाल
X

प.बंगाल, तामिळनाडू, आसाम केरळ आणि पुद्दूचेरी या राज्यांच्या निधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल आता हाती आले आहेत. यंदा एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आतापर्यंतचे कल दिसत आहेत. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा बहुतमाच्या जवळ गेल्या आहेत. पण भाजपनेही पहिल्यांदाच प. बंगालमध्ये 100च्या पुढे जागांवर आघाडी घेतली आहे. तामिळनाडूमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता आता आणखी पक्की झाली आहे. इथे डीएमकेने बहुमताचा आकडा पार केला आहे. आसाममध्ये भाजपने पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. केरळ मध्ये डाव्यांनी पुन्हा सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. पण इथे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. प. बंगालमध्ये डाव्यांच्या जागा आणखी कमी झाल्या आहेत. सध्याच्या कलांनुसार भाजपला प.बंगालमध्ये जागा वाढण्यात लाभा दिल्याचे दिसत आहेत. पण एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांना पराभूत करता आलेले नाही, हे सुरूवातीच्या कलांवरुन दिसत आहे.

Updated : 2021-05-02T10:25:14+05:30
Next Story
Share it
Top