Home > Max Political > #ElectionResults : काँग्रेसचा सफाया, गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

#ElectionResults : काँग्रेसचा सफाया, गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

#ElectionResults :  काँग्रेसचा सफाया, गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
X

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी यांचा झंझावाती प्रचार, प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात लावलेली ताकद या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या निकालांनी काँग्रेसची निराशा केली आहे. मोदी सरकारविरोधात बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था, कोरोना संकटातील अपयश, शेतकऱी आंदोलन असे सगळे मुद्दे असतानाही ४ राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे, इथे काँग्रसेने आपली सत्ता गमावली आहे. यामुळे पुन्हा एकदा गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उ. प्रदेशात प्रियंका गांधी फेल

प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातून सक्रीय राजकारणात एन्ट्री केली. त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढला होता. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशात आपणच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू असेही त्यांनी संकेत दिले, पण २४ तासात त्यांनी ही भूमिका बदलली होती. सर्वाधिक महिला उमेदवारांना संधी देत प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना शह देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची ही खेळी उत्तर प्रदेशात चालली नाही.

राहुल गांधी यांनी या निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट केले होते. मोदी सरकारचे अपयश त्यांनी या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवला. या पाचही राज्यांच्या निवडणुकीत राहुल आणि प्रियंका गांधी यांचेच चेहरे प्रचारात पुढे होते. याशिवाय इतर काँग्रेस नेते प्रचारात फारसे पुढे दिसले नाहीत.

पंजाबमध्ये सिद्धू यांना जास्त महत्त्व देण्याचा डाव उलटला

निवडणुकी आधीच्या अखेरच्या काही महिन्यात राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये नेतृत्व बदल केला. पण हाच बदल काँग्रेसला मारक ठरल्याचे निकालांमधून दिसते आहे. नवज्योतसिंह सिद्धू विरुद्ध अमरिंदर सिंग यांच्या संघर्षात राहुल गांधी यांनी सिद्धू यांना महत्त्व दिले, पण याचा फटका पंजाबमध्ये बसलेला दिसतो आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वावर राहुल गांधी यांनी विश्वास दाखवला होता, पण पंजाबच्या जनेतेने त्यांचा विश्वास चुकीचा ठरवला आहे. त्यामुळे आता २०२४च्या लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपच्या विजयानंतर विरोधकांना सल्ला दिला आहे.


Updated : 10 March 2022 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top