News Update
Home > मॅक्स मार्केट > उद्धव ठाकरे कडाडले...

उद्धव ठाकरे कडाडले...

उद्धव ठाकरे कडाडले...
X

आजच्या शिवसेना बैठकीत राज्याच्या पक्षांतर्गत आढावा घेण्यात आला. मार्च एप्रिल महिन्यापासून मी नेत्यांशी बोलत आहे. नागपूर आणि इतर ठिकाणी जाऊन माझा दौरा केला होता. त्याप्रमाणे विदर्भ चा दौरा करताना लक्षात आलं की सर्वांची एकत्रित बैठक घेतली तर ते महत्वाचं ठरेल. भाजपच्या एका आमदारांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ती हींन वृत्ती आहे. माता भगिनींचा अवमान करणाऱ्या वर कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही पाहिजे. त्यांनी छिंदम आणि परिचारिकवर कारवाई केली तशी भाजपने राम कदम यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

गुजरात मधील हार्दिक पटेल याला फोन केला होता. हार्दिक पटेल समाजाच्या आरक्षण साठी उपोषण सुरू केले आहे. त्याच्या उपोषणाचा १२ वा दिवस आहे.त्यानं उपोषण सोडावे असं मी त्याला सांगितले. उपोषण कोणा पुढे करायचं ज्याना संवेदना आहेत त्याच्या समोर उपोषण करून फायदा आहे.गुजरात आणि समाजाला तुझी गरज आहे. अतिरेकी आणि पाकिस्तान मधे बोलण्या पेक्षा देशातील तरुणांशी संवाद करून प्रश्न सोडवा. नवीन गोष्टी घडत आहे पोलिस पत्रकार परिषद घेत आहेत.शहरी नक्षलवाद आणि सनातन याबद्दल नुसते आरोप करू नका खऱ्या चे पुरावे सादर करा. हिंदू दहशतवाद या सरकारच्या काळात बोलले जात असेल तर ते दुर्देव आहे.

नोटबंदी फसली याची जवाबदारी कोण घेणार. मृत्यूच्या शैयेवर रुपया आहे याची सरकार जवाबदारी घेणार का? गरज पडली तर पुन्हा नोटबंदी लावू हे RBI पुन्हा सांगत आहे हे जनता सहन करणार नाही. महामंडळ ची यादी दीड दोन वर्षांपूर्वी ची आहे.आम्हाला कुठली ही अपेक्षा नाही.सत्तेत राहून आम्ही विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सोडवत आहोत.

Updated : 5 Sep 2018 11:07 AM GMT
Next Story
Share it
Top